जन्मतःच तिचं नाक चपटं होतं. ते नाक बरं होईल असा विश्वास तिला अनेक डॉक्टरांनी दिला. त्यासाठी दोन शस्त्रक्रियाही झाल्या. मात्र, तिला नाक मिळांल ते गोकूळदास तेजपाल (जी.टी.) रुग्णालयातील डॉक्टरांमुळे. युद्धातील जखमींवर वापरायची शेकडो वर्ष जुनी शस्त्रक्रिया त्यासाठी डॉक्टरांनी वापरली.
माझं नाक चपटं होतं. जन्मतःच ते तसं असल्याने आसपासच्या लोकांना त्याची सवय होती. पण मला वाटतं होतं माझं नाक व्यवस्थित होईल का? तीन वर्षांपासून बऱ्याच डॉक्टरांकडे दाखवलं. शस्त्रक्रिया झाल्यामुळे त्रास झाला. पैसे गेले पण नाक काही व्यवस्थित झालेलं नाही. शेवटी इथे आले अहमदनगर जिल्ह्यातल्या पाथर्डी गावाहून जी.टी. रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी दाखल असलेली कोमल डहाळे (19 वर्षे) सांगते. ऑगस्ट महिन्यापासून कोमल मुंबईच्या जी.टी रुग्णालयाच्या प्लास्टिक सर्जरी विभागात उपचार घेत आहे. तिच्यावर टॅगलियाकोझी ही इटालियन शास्त्रज्ञाने शेकडो वर्ष पुर्वी केली शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. रुग्णालयाच्या प्लास्टिक सर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. नितीन मोकल यांनी सांगितले, त्यानुसार अत्यंत जुनी पद्धती असून सध्या वापरात नाही. मात्र, काही डॉक्टरांकडून तिच्यावर शस्त्रक्रिया झाली ज्याने सध्या वापरात असलेल्या पद्धती वापरुन तिच्यावर शस्त्रक्रिया करणं योग्य नव्हतं. म्हणून टॅगलियाकोझी या पद्धतीचा वापर करण्याचा निर्णय घेतला.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews